इन्टरनेट वर सर्च करतांना अचानक एखादी पोर्न साईट ओपेन होते. घरच्यांसोबत असतांना अशा साईट्स ओपन झाल्याने शरमेने मान खाली जाते. खूपच अश्लील अशा साईट्स ओपन होत असल्याने मोबाईल आपण इतरांच्या हातात देणे टाळतो. पण लवकरच असा नको असलेल्या किंवा पोर्न साईट्स पासून ‘ हर हर महादेव हे अॅप सुटका करणार आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या इंस्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्सच्या न्युरोलॉजीस्ट आणि त्यांच्या टीमने ‘हर हर महादेव’ या अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपच्या मदतीने नको असलेल्या आणि अश्लील साईट्स ब्लॉक करता येणार आहेत. रजिस्ट्रेशन केल्यानंतर हे अॅप डाऊनलोड करता येईल.हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर एखादी नको असलेली साईट ओपन झाल्यास भक्ती गीत ऐकायला येणार आहे. यामुळे इंटरनेट वापरणे सहज आणि सुरक्षित होणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews